Saturday, December 15, 2012
Tuesday, November 6, 2012
मांडिले मी घडीचे हे डाव सारे
रक्ताळले काळजाचे घाव सारे
माझेच हिताचे बाजूस माझ्या
वेळेवरी करती घुमजाव सारे
एकटाच म्हणावयास मी सदा
तरी डोळ्यात दिसे गाव सारे
सरकल्या सावल्या आज पुढे
झालो रंक मी अन ते राव सारे
रंगली मैफिल जखमांची अन
माझे ते टाळून गेले नाव सारे
म्हणती सारेच सोडून ती गेली
उमटती तरी शब्दात ठाव सारे
शब्दवेडा मी
Saturday, October 20, 2012
किती म्हणून रे लिहावं
किती म्हणून रे लिहावं
रात्रीला मांडत बसावं
जसं चांदण उन्हातलं..
किती म्हणून रे लिहावं
मी दुखः हे प्रारब्धातलं
जाणून कोण घेतो इथे
दुखः माझ्या शब्दातलं
किती म्हणून रे लिहावं
कागदावरी फक्त साज
भेटला न अजुनी सये
त्या जखमेवरी इलाज
किती म्हणून रे लिहावं
लिहायचं म्हणून लिहायचं
शब्दांच्या वर्तमानातून का
माझ्या भूतकाळात पाहायचं
किती म्हणून रे लिहावं
आज गुदमरला श्वास
हात सुटला लेखणीचा
अन डगमगला विश्वास
शब्दवेडा मी
चल बस झालं आता
चल बस झालं आता सये जगासोबत चालणं
कुणी ऐकेल म्हणून सदा डोळ्यातून बोलणं...
चल बस झालं आता ते नियम जगाचे पाळणं
कुणाची नजर लागली म्हणत स्वप्नांना जाळणं......
चल बस झालं आता जातीपातीत अडकून राहणं
बंधनाच्या अमावसेच चांदण डोळाभरून पाहणं .........
चल बस झालं आता घाबरून दूर निघून जाणं
युगल गीत ते आपलं नेहमी एकट्यात गाणं.........
चल बस झालं आता शब्दांचे खेळ करत बसणं
"शब्दवेडा मी" म्हणत स्वतःच अस्तित्व पुसणं ..
शब्दवेडा मी
Monday, October 1, 2012
Wednesday, August 22, 2012
Monday, April 16, 2012
Tuesday, March 6, 2012
Tuesday, January 3, 2012
Subscribe to:
Comments (Atom)





















