Thursday, April 14, 2011

का रूपावरून ठरवता सये
नेहमी सौंदर्याच्या परिभाषा
चारित्र्याचे शिंपले न बघता
का बाळगावी मोत्यांची आशा ?

KP Always4U
अवघड आहे तिला समजणे सये
दिसता मी लगेच मौन धरते
शब्द शस्त्र पारंगत जरी मी
निशब्द राहून माझा पराभव करते

KP Always4U
चिंब चिंब रोम भिजवण्यास सये
पुरेशी प्रेमाच्या ती एकच सर
नाहीतर हि मुसळधार पावसात
कोरडेच असतात इथे पुष्कळ ...

KP Always4U
आज ही स्मरणात शेवटची ती भेट सये
हसत हसत ती निरोप देत होती मला
काही प्रश्न सोबत ठेवून स्वतःच्या तर
काहींची उत्तरे शोधण्यास तिने सोडले मला


KP Always4U
आसवांशी तूच माझं सये
कधी वैर दिलं होत करून
फितुरी मीच केली वाटते
येतात ते रोज वैर विसरून


KP Always4U
पाहिलंय मी त्या ज्योतीस सये
कुणासाठी तरी जळत असते ती
प्रकाशित होतात अव्यक्त भावना
तरी अर्थ तयाचे टाळत असते ती ?

समजत असतं तिला संपतेय सारं
तरी वाटेवर का त्या धावत असते ती
उमजत नाही सार तिच्या कर्तव्याचे की
कुणाला दिलेलं वचन पाळत असते ती ?

काहूर उठत असेल तिच्या ही मनी
दिसते कधीतरी घुटमळत असते ती
मंदावला प्रकाश आरोप होतो तिच्यावर
कुणासाठी हे सर्व दूर सारत असते ती ?

मंदावत जाते शेवट येतो जवळ तिचा
तरी का जगण्यास धडपडत असते ती
बाकी काय उरते ओंजळीत तिच्या ?
कुणासाठी हे आयुष्य सांडत असते ती ?
KP Always4U







Wednesday, April 13, 2011

एक अनामिक

एक अनामिक मला म्हणाला सये
का रे विरहाचे शब्द खेळ करतो ?
मी म्हटलं काही नाही भावा असंच
आसवे पुसायला या शब्दांचा पदर धरतो ..

एक अनामिक मला म्हणाला सये
का रे ती का सोडून गेली तुला ?
मी म्हटलं काही नाही भावा असंच
मीच तुटलेल्या फांदीवर बांधला झुला

एक अनामिक मला म्हणाला सये
का रे तिची भेट कधीच नाही होणार ?
मी म्हटलं काही नाही भावा असंच
मीच कधी तिच्या वाट्याला नाही जाणार ..

एक अनामिक मला म्हणाला सये
हे काव्य आणि लिखाण कुणासाठी ?
मी म्हटलं काही नाही भावा असंच
शब्द संपती हि तिनेच दिली माझ्या ओठी

एक अनामिक मला म्हणाला सये
अर्थ काय असतो तुमच्या या सयेचा
मी म्हटलं काही नाही भावा असंच
तो फक्त शब्द नाही आहे अर्थ निर्मळ मायेचा
तो फक्त शब्द नाही आहे अर्थ निर्मळ मायेचा

KP Always4U
पाऊस हा आठवणीचा सये
का या सरी संगे राहत नाही .
निघून जातात जश्या त्या सरि
का त्यांच्यासवे हा वाहत नाही?

भिजतात पापण्या कधी तर
कधी हास्य हि चमकते गालावर
गुमानी हा पाऊस का नेहमी
नाचवतो त्याच्या तालावर?...

आज म्हटलं विचारावं त्याला
का रे छळ मांडतोस या जीवाचा
तोच पलटून माझ्यावर बरसला
सांग यात दोष आहे कुणाचा?

मी तर माझं काम करत असतो
खेळ तुमच्याच मनाचे मांडत असतो
तुम्हीच जेव्हा कोरडे होता माझ्याविना
मी तेव्हाच तुम्हाला भिजवत असतो ...

एवढंच सांगून तो परत निघून गेला
मी मात्र उभा तिथेच चिंब भिजलेला
आज कधी नव्हे तो एकाकी जीवाला
त्याच आठवणीच्या पावसाचा आधार वाटला .

त्याच आठवणीच्या पावसाचा आधार वाटला .....