Saturday, July 23, 2011


शुभ्र सहवास तुझा लाभला सये 
जणू अंगणी चांदण्याचा सडा
तुझं आयुष्यात येणं म्हणजे 
कोजागिरीच्या मोहक चंद्र कळा

KP Always4U

उन्मळून पडू दे आता सये
असाह्य ती विरहाची झाडं
एकच श्वास दोघांचा होवू दे
नको होवू कधीच नजरेआड 

KP Always4U


भुलवण्या माझी वाट आज सये
आभाळाने बघं  इंद्रधनू पसरला 
सप्तरंग तर माझ्यासोबत आहेत
बहुतेक तुला बघण्यास तो विसरला  

KP Always4U

नयनाच्या अथांग सागरात सये 
बघं भावनांची नाव दिसत आहे 
मावळत सूर्य हळूच निरोप देत
सोनेरी रंग विखरून हसत आहे 

KP Always4U 

प्रतिबिंब उमटले बघं नयनात सये
मिठीत कसे दोन जीव विसावले 
दिसता मिलनाचा रम्य सोहळा 
सूर्यानेही  तेज स्वतःचे  लपवले

KP Alaways4U

Friday, July 22, 2011



निळ्या आभाळाचं या काळ्या धरतीवर प्रेम 
पावसाच्या रूपाने नेहमी जात असते उतू,
कुणीच म्हणून नये पावसाळा याला सये
हा तर त्यांच्या निर्मळ  मिलनाचा ऋतू  

KP Always4U

Thursday, July 21, 2011

चांदण्याची टीम टीम आहे ती सये
रांगोळीचे ठिपके काढलेस तू नभी ?
डाग म्हणतात ज्याला चंद्रावरचा तो
तुझ्या गालावरची तर नाही खळी ?

KP Always4U

Wednesday, July 20, 2011


काही रंग सांडले आहेत बघं  सये
हातावर प्रेमाच्या फुलपाखराचे, 
विश्वासाच्या कुंचले घेवून मला  
आपले आयुष्य आहे रंगवायचे

KP Always4U



अंधारलेल्या आहेत जरी वाटा सये
माझा माझ्यावरती भरवसा आहे 
काळोख चिरत येतो सामोरी जो  
बघ मी तोच तर "कवडसा" आहे

KP Always4U 

अंधकार असतो जेव्हा प्रश्नांचा सये
तेव्हाच तुझ्या प्रेमाचा होतो प्रकाश
वाटते परक्या सारखं या जगी मला
तेव्हा तुझ्या आधाराचे दिसते आकाश

वाऱ्याने मारली टपली  तिला सये
अन ओढणीने जमिनीवर घेतली धाव
सावरत स्वतःला लाजली ती नकळत 
   नजरेनेच हृदयावर करून गेली घाव ....

KP Always4U